सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंधारी येथे सोमवारी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सिल्लोड येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागा मार्फत सेवासंकल्प अभियान राबवण्यात आले गावात सोमवारी आठवडी बाजार असल्याने १० गावांचे नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण गावात प्रभात फेरी काढन्यात आली. स्वछता अभियान राबवून, वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी सिल्लोड येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता सोमेश्वर गीते यांनी पाणी वाचवा जीवन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन गावात शाळेत, परिसरात, रुग्णालयाच्या
प्रभात फेरी, स्वछता अभियान, वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात अवती भवती स्वच्छता ठेवण्याचा संदेश देऊन अभिनव उपक्रम राबवला.
अंधारी येथील प्रा. आ. केंद्र, जि. प. शाळेच्या आवारात व गावात स्वच्छता अभियान राबवून जिल्हा परीषद शाळेच्या आवारात जवळपास २५ वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांनी आपले विचार मांडले.
प्रास्तविक दादासाहेब काळे यांनी करून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व पटवून दिले. हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी मुख्याध्यापक एकनाथ जाधव, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अजिंक्य महालकर, कर्मचारी त्याच प्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर भादवे, व ग्रा. प. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार दादासाहेब काळे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.